मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Pimpri Chinchwad News: दापोडीतील हॅरिस पुलाजवळ नदीपात्रात आढळला मृतदेह

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

Pimpri Chinchwad News: दापोडीतील हॅरिस पुलाजवळ नदीपात्रात आढळला मृतदेह

दापोडी : दापोडीतील हॅरिस पुलाजवळ नदीपात्रात आज सकाळी 11 वाजता एक मृतदेह आढळून आला.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील मुख्य अग्निशमन केंद्राला सकाळी अकराच्या सुमारास मृतदेहाची माहिती मिळाली. त्यानंतर पीसीएमसी मुख्य अग्निशमन केंद्राचे पथक हॅरिस पुलाजवळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. (Pimpri Chinchwad News Marathi)

पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.