मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Horoscope Today 1 July 2024: या राशीच्या लोकांना मिळेल नोकरीमध्ये बढती, या व्यक्तींचा होईल राजकारणात पराभव

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

Horoscope Today 1 July 2024: या राशीच्या लोकांना मिळेल नोकरीमध्ये बढती, या व्यक्तींचा होईल राजकारणात पराभव

आजचे राशीभविष्य : दैनंदिन राशिभविष्य च्या माध्यमातून सहज घडणाऱ्या घटनांचा वेध घेता येतो. बऱ्याच वेळा राशिभविष्याच्या माध्यमातून सांगितलेले भाकित योग्य वेळी चांगला संकेत प्राप्त करून देतात. आजच्या दिवसात काय घडेल? कोणत्या राशीसाठी शुभ संकेत आहेत हे सर्व जाणून घेऊया आजच्या राशी भविष्यच्या माध्यमातून. 

मेष राशी

कौटुंबिक जबाबदारीचे ओझे अचानकपणे वाढू शकते. नातेवाईकांसोबत चांगले संबंध ठेवा भविष्यात त्यांच्याकडून तुम्हाला मदत होणार आहे. तुम्ही जे बोलता ते विचार करून बोला म्हणजे अपमानित होण्याची वेळ येणार नाही. कुठलंही काम जोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत त्याविषयी कुणाकडेही बोलू नका. 

वृषभ राशी

आजची वेळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे, सर्व काही तुमच्या मनाजोग घडू शकत. धैर्य आणि शौर्य दोन्ही गोष्टींमध्ये मोठी वाढ होईल. विचार सकारात्मक ठेवा मनाला नैराश्येच्या गर्दीत जाऊ देऊ नका. व्यापार क्षेत्रामध्ये नवीन मित्र होतील. नोकरदार वर्गामध्ये बढती मिळू शकते. 

मिथुन राशी

राजकारणामध्ये तुमच्या शत्रू कडून तुमचा पराभव होण्याची चिन्ह दिसत आहे. न्यायालयाच्या प्रकरणांमध्ये लागणारा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दूर कुठेतरी बिझनेस ट्रीपला जाण्याचा योग आहे. व्यवसायामध्ये मिळालेले नवीन सहकारी तुम्हाला लाभदायकच ठरतील. 

कर्क राशी

दिवस सकारात्मकतेने सुरू होईल. विचारपूर्वक केलेल्या कुठल्याही कामांमध्ये मनाजोगे यश मिळू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात बढती मिळू शकेल. काही वर्षांपासून प्रलंबित असलेले तुमचे जुने प्रश्न आज सुटू शकतात. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तींची सुटका होईल. 

सिंह राशी

सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये चांगली बातमी प्राप्त होईल. मित्रांच्या मदतीने तसेच नातेवाईकांच्या मदतीने अडचणी सोडवण्यास मदत होईल. नोकरीमध्ये व व्यवसायामध्ये असणाऱ्या व्यक्तींना चांगला नफा होणार आहे. मनामधील समाधान अनेक पटींनी वाढीस लागेल. 

कन्या राशी

नवीन कार्य तुमच्या हातून घडू शकते. नातेवाईक आणि मित्र यांच्याकडून मनाप्रमाणे सहयोग लाभेल. कार्यक्षेत्रामध्ये बरेच बदल जाणवतील. प्रलंबित असलेले काही प्रश्न येत्या काही दिवसांमध्ये सुटू लागतील. सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका वठवाल. 

तूळ राशी

सुख आणि दुख दोन्हीही चाखायला मिळतील. विरोधी पक्ष तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करेल मात्र तुम्ही खचून जाऊ नका. जवळच्या सहकाऱ्यांशी किरकोळ कारणावरून वाद उभे राहू शकतात. सहकाऱ्यांसोबत चांगली वागणूक प्रस्थापित करण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा. 

वृश्चिक राशी 

यश संपादन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. विरोधी पक्ष तुमचा कमकुवतपणा कसा बघता येईल यावर लक्ष ठेवत आहे. तुमच्या भावनांना वाट मोकळी करून द्या फक्त जवळच्या व्यक्ती जवळच. राजकारणामध्ये प्रतिष्ठा व पद दोन्ही गोष्टी मिळण्याचे चिन्ह आहे. 

धनु राशी 

कुटुंबातील व्यक्तींसोबत कठोर भाषा वापरने टाळा, तुमच्या कठोर बोलन्यामुळे तुम्हालाच त्रास होईल. ऑफिसमध्ये तसेच मित्रमंडळीमध्ये तुमचे गोड बोलणे व चांगले वागणे यावर सर्वजण खुश होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे तरी सातत्यपूर्ण अभ्यास करण्यावर जोर देणे. 

मकर राशी

सध्याचे दिवस चढउतारांनी भरलेले आहेत काळजी घ्या. नातेवाईकांशी अगदी छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, शांतता राखा. व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांना भविष्यातील योग्य संकेत मिळू लागतील. तुमच्या योजना शक्य तेवढ्या गुप्त ठेवा. 

कुंभ राशी

बेरोजगार व्यक्तींना रोजगार प्राप्त होईल. दूरवरच्या यात्रेला जाव लागू शकत. कोर्ट कचेरीच्या संबंधात यश खेचून आणाल. राजकारणामध्ये तुमचे विरोधी दारून पराभव स्वीकारतील. काही निर्णय घेताना आपसूकच जोखीम घ्यावी लागेल. कुटुंबाकडून तुमच्या कामात सहयोग मिळेल. 

मीन राशी 

कार्यक्षेत्रामध्ये विनाकारण तुमचा अपमान होऊ शकतो, अशावेळी शांतता राखणे गरजेचे. व्यवसायामध्ये कष्ट जास्त करावे लागतील व उत्पन्न कमी राहील. जवळच्या मित्राच्या भेटी होतील. बौद्धिक कार्यक्षेत्रामध्ये लोकांना जास्त लाभ मिळेल. येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या मनाप्रमाणे यश मिळणार आहे. 

Disclaimer – आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. वरील माहिती प्राप्त स्त्रोतांवरून घेण्यात आलेली आहे. वर दिलेल्या तथ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा दावा आमच्याकडून केल्या जात नाही. राशिभविष्य विषयी असलेले विचार तुमचे वैयक्तिक असतील.