मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Horoscope Today 19 June 2024: दुःखाचे दिवस जातील सरून, या राशीतील लोकांना होईल विशेष लाभ 

Rushikesh Aher

By Rushikesh Aher

Updated on:

Horoscope Today 19 May 2024: दुःखाचे दिवस जातील सरून, या राशीतील लोकांना होईल विशेष लाभ 

Rashi bhavishya in Marathi Today: आजचा दिवस कसा जाईल, कोणाला कशा मधून कशाप्रकारे लाभ मिळेल, कोणत्या समस्या डोईजड ठरतील, काही अशा गोष्टी ज्याची विशेष काळजी घेणे गरजेचे ठरेल. पहा आजचा तुमच्या भाग्याला उजाळा देणार तुमचं राशिभविष्य. 

Horoscope Today In Marathi

मेष

घरी पाहुण्यांचा राबता असण्याची शक्यता आहे. दूरवरच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायात असणाऱ्या व्यक्तींचा व्यवसाय जोर धरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना समाधानकारक स्थिती राहील. केलेली गुंतवणूक चांगला परतावा देण्याची शक्यता आहे. 

तुमचा आत्मविश्वास वाढेल मात्र त्यासोबत विरोध होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. वाद विवाद टाळणे गरजेचे आहे वाद विवादामुळे समस्या उद्भवू शकतात. जुना आजार असलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज आहे. कौटुंबिक चिंता वाढीस लागेल. 

वृषभ

तुमचे विरोधक सक्रिय असतील शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. इतरांच्या कामांमध्ये हस्तक्षेप करून नका अन्यथा तोटाच होईल. व्यवसायासाठी केलेला दूरवरचा प्रवास यशस्वी होईल. ज्या कामाची अपेक्षा नाही तिथूनही लाभ प्राप्त होईल. 

व्यवसायामध्ये फायदा होण्याचे संकेत. गुंतवणुकी मधून अनपेक्षित पणे लाभ प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये किंवा मुलाखतीमध्ये यश मिळण्याची शक्यता. नशीब जोरावर आहे. मन आनंदी राहील. 

मिथुन

अनपेक्षितपणे खर्चामध्ये वाढ होईल. इतरांशी संवाद साधताना चुकीचे शब्द वापरणे टाळा अन्यथा वाद वाढण्याची शक्यता खूप आहे. कुटुंबामधील इतर सदस्यांच्या आजाराची चिंता सतावत राहील. ताण तणाव मागोवा घेणार. 

जुनाट आजार पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह दिसतात. व्यवहार करताना विचारपूर्वक समजून व्यवहार करणे सोयीस्कर. कुणाच्या बोलण्यामुळे प्रभावित होऊन भाळून जाऊ नका. महत्त्वाचे असलेले निर्णय शांत मनाने घ्या. 

कर्क

धनहानी होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून काळजी घेणे अनिवार्य. एखाद्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखण्याची शक्यता. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी वाटत राहील. वाद टाळणे गरजेचे विरोधक शांत असतील. 

थकबाकी असेल तर वसूल करण्याचे प्रयत्न यशस्वी खूपच कमी प्रमाणात होतील. प्रवास करत असाल तर प्रवास लाभदायक ठरू शकतो. व्यवसाय मनाप्रमाणे चालेल. नोकरीच्या ठिकाणी कुणाचा त्रास सहन करावा लागणार नाही.

सिंह

ताण तणाव व अनावश्यक चिंतेचे वातावरण डोक्यावर घोंगावत राहील. तुम्हाला त्रास देणारे तुमची विरोधक पराभूत होताना दिसतील. मिळणारे सहज प्राप्त होतील.  काहीतरी नवीन योजना आखण्याचा तुमचा प्लॅन असेल मात्र त्वरित फायदा मिळण्याची शक्यता नाही. 

तुमच्या कामकाजामध्ये अगोदर पेक्षाही अधिक चांगले बदल दिसून येतील. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही अग्रेसर असाल. मनाजोगता मानसन्मान मिळणे कठीण जाईल. म्युचल फंड आणि शेअर मार्केट मधून मनासारखा फायदा मिळू शकतो. 

कन्या

सध्याच्या वेळेला अनेक नवनवीन गोष्टी तुमच्यासमोर नवख्या येत आहे. तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांसाठी सामना करायला तुम्ही तयार राहणे गरजेचे आहे. फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या वायफळ बडबड टाळणे फायदेशीर. 

जास्त प्रयत्न करण्याची गरज भासत आहे, यामुळे तुमच्या प्रगतीचा पाया आणखीनच खोलवर रुजेल. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी वेळ द्या. आज कामामध्ये थोडा आळस जाणवेल मात्र तो स्वभाविकच आहे, कारण गेल्या काही दिवसापासून तुम्ही जलद गतीने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात. 

तुला

अध्यात्मामध्ये असलेली गोडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या सतपुरुषाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. न्यायालयामध्ये तुमचे चालू असलेले काम तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होतील. नोकरदार असलेल्या व्यक्तीचा ऑफिसमध्ये चांगला प्रभाव पडेल. 

व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या सहकारी कर्मचाऱ्यांकडून योग्य वेळेस सहकार्य मिळेल. अगोदरची रखडलेली कामे पूर्ण होतील. निष्काळजीपणे राहणे धोक्याची घंटा आहे. 

वृश्चिक

एखादा जुना असलेला आजार पुन्हा उद्भवू शकतो. दूरच्या व्यक्तीकडून एखादी निराशा जनक बातमी हाती येऊ शकते. गरज नसताना धावपळीमध्ये वाढ होईल. इतरांच्या वागण्यामुळे नाराज होण्याची वेळ येऊ शकते. 

अपेक्षित कामामध्ये विलंब होऊ शकतो. अगोदर पेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. जवळच्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या नाराजीला सामोरे जाण्याचा प्रसंग येऊ शकतो. नेहमीप्रमाणे व्यवसायामध्ये वृद्धी होईल. 

धनु

कायदेशीर पणे अडथळे दूर होऊन जातील. मनाप्रमाणे लाभदायक किती प्राप्त होण्याची शक्यता जास्त आहे. थोडा थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं नेहमीप्रमाणेच सहकार्य प्राप्त होईल. 

नेहमीच्या व्यवसायामध्ये अधिक वृद्धी होऊ शकते. गुंतवणूक करताना घाई करणे जाणून-बुजून टाळा. नोकरीच्या ठिकाणी शांत वातावरण राहील. येणारे पैसे सहज प्राप्त होतील. मित्रांचे सहकार्य लाभण्याची शक्यता व ठरलेले काम वेळेवर पूर्ण होतील. 

मकर

कुठल्याही गोष्टीमध्ये घाई गडबड अजिबात करू नका अन्यथा नाहक समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त आहे. शरीर रिलॅक्स राहील, गुंतवणुकीमध्ये घाई करणे टाळा. जमिनीची आणि घराची खरेदी विक्रीची योजना मनाप्रमाणे आखाल. 

नोकरदार वर्गाचा ऑफिसमध्ये असलेला प्रभाव आणखीन वाढेल. उत्पन्नामध्ये काही प्रमाणात का होईना सकारात्मक वाढ होईल. नोकरीसाठी चालू असलेल्या पाठपुराव्यामध्ये यश मिळू शकते. बेफिकिर राहणे टाळून सावध राहणे गरजेचे. 

कुंभ

ठरलेल्या प्रमाणे प्रवास मनोरंजनात्मक ठरेल. स्वादिष्ट भोजनाचा आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश प्राप्त होईल. व्यवसायामध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. अति व्यस्ततेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

पैसे सहज प्राप्त होतील व मित्र चांगले रीतीने सहकार्य करतील. अगोदरच्या रखडलेल्या कामांना चांगली गती प्राप्त होईल. आनंदी असण्याची चिन्ह दिसत आहे. जोखीम घेण टाळलेल बरं. 

मीन

व्यवसायासाठी करण्यात आलेल्या प्रवास मनाजोग ठरेल. काही प्रमाणामध्ये अस्वस्थता जाणवेल. केलेले प्रयत्न काहींना काही फळ नक्की देतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता जास्त. सामाजिक कार्यामध्ये रुची घेऊन कार्य कराल. 

मान सन्मान मनाप्रमाणे प्राप्त होईल. गुंतवणूक चांगला फायदा देऊ शकते. कुठल्याही स्थितीमध्ये धोका घेणे टाळा. तुमच्या भागीदारांचे सहकार्य मनाप्रमाणे मिळेल. घरामध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी आनंदाच्या कारंजा उडतील.