मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

आजचे राशी भविष्य 20 June 2024: आर्थिक रखडलेली सर्व कामे लागतील मार्गी, एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत वाढीस लागतील

Rushikesh Aher

By Rushikesh Aher

Published on:

Horoscope Today 20 June 2024 in Marathi

Horoscope Today 20 June 2024 in Marathi: कोणत्या राशीचे चांगले दिवस व कोणत्या राशींना आव्हान तसेच आर्थिक प्रगती, शैक्षणिक प्रगती, यावर तुमच्या राशींचा पडणारा प्रभाव सर्व काही जाणून घ्या आजच्या शुभ राशींच्या माध्यमातून.

मेष राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींचा असू शकतो, सावधगिरीने बाळगा. नवीन जबाबदाऱ्यांची जाणीव होईल ज्या तुम्हाला धैर्याने पार पाडाव्या लागतील. रखडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. इतरांकडे गुंतून पडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना विशेष मेहनत घेण्याची गरज.

वृषभ राशी

कुठलंही नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल राहणार नाही. नशीब पाहिजे तेवढ्या जोरावर नाही. तुमचे दिवसभराचे काम पूर्ण करून कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा चांगला योग. मुलांच्या भविष्याबाबत जागरूकपणे विचार कराल. राजकारणामध्ये मागे पडण्याची शक्यता आहे. यशाकडे वाटचाल होण्याची घडी जवळ येत आहे. व्यस्त जीवनामधून जोडीदारासाठी खास वेळ काढावा लागेल. (Marathi Daily Horoscope)

मिथुन राशी

मणाजोगी बातमी मिळेल त्यामुळे तुमच्या मनोबलामध्ये वाढ होईल. इतरांना उधार दिलेले पैसे आज मिळण्याची शक्यता आहे, यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत होईल. व्यवसायाशी जे संबंधित लोक आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस सामान्य असेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद लाभण्याचा योग. आईसोबत मतभेद होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सावधगिरीने रहा.

कर्क राशी

कुटुंबामध्ये शुभ कार्य घडण्याची वेळ आहे त्यामुळे शुभकार्यामध्ये व्यस्त असाल. आज घेतलेली निर्णय भविष्यामध्ये चांगला परतावा देतील. जवळचा एखादा सहकारी तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी निर्माण करू शकतो, अशावेळी सावध रहाणे गरजेचे. संध्याकाळचा निवांत वेळ धार्मिक कार्यामध्ये घालवाल अशी शक्यता. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळू शकते.

सिंह राशी

जुना वाद उन्हाचा वाटेवर येण्याची शक्यता वेळेवर सावध व्हा. मनामध्ये आनंदाची लहर वेळोवेळी साकार होईल. लाईफ पार्टनरला खुश करण्यासाठी काहीतरी आवडती भेटवस्तू खरेदी कराल. नवीन ओळख निर्माण केल्यामुळे मित्रांची संख्या वाढेल. घरी पाहुणे येण्याचा योग आहे त्यामुळे तुमच्या खिशाला ताडन बसेल. कुटुंबासोबत मनसोक्तपणे संवाद साधाल. कुठलाही काम न करता यश पाठीमागे येईल. (Daily Horoscope Today Marathi)

कन्या राशी

तुमच्या हातून मोठ्यांची सेवा घडेल आणि चांगल्या कामासाठी तुम्ही पैसे खर्च कराल, यामुळे तुमच्या मनात आनंदी वातावरण तयार होईल. जोडीदारांसोबत भांडण होण्याची शक्यता संवाद साधून वेळीच प्रेम व्यक्त करा. मित्र घरी आल्यामुळे त्याचा आनंद होईल. डोकेदुखीची समस्या वाढू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा कुणाशीही विनाकारण वाद घालू नका.

तूळ राशी

आजचा दिवस तुम्ही दिवसभर कामांमध्ये व्यस्त असाल. नाहक खर्च वाढण्याची दाट शक्यता. तुमच्या नेहमीच्या कामामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. अनावश्यक धावपळीमुळे मन अस्वस्थ राहू शकते. कामातून स्वतःसाठी वेळ मिळाल्याने मन प्रसन्न होईल. आरोग्याच्या समस्यांवर मात कराल. बाहेर खाण्यापिण्याच्या सवयी कडे लक्ष देण्याची गरज. आज पासून आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास सुरुवात होईल.

वृश्चिक राशी

आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने येतील. जवळच्या मित्रांची भेट घेतल्यास मन आनंद व्यक्त करेल. कुटुंबामध्ये सुख शांती मोठ्या प्रमाणात येईल. तुमच्या वरिष्ठांकडून तुमची खास प्रशंसा होईल. कौटुंबिक असलेल्या व्यवसायामध्ये पालकांची पूर्ण मदत मिळेल. जोडीदाराच्या सल्ल्याने काम केल्यास यश येण्याची दाट शक्यता.

धनु राशी

आजचा दिवस समाधानी जाईल. तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळण्याची खात्री, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही आणखी परिश्रम घ्याल. घरातील धनसंपत्तीमध्ये सामान्यपणे वाढ होईल व मित्रांकडून पैसे परत मिळतील. संध्याकाळच्या वेळी संपूर्ण कुटुंबासोबत शुभकार्यामध्ये सहभागी होऊ शकता.

मकर राशी

आज नशिबाची साथ मिळण्याची पूर्वीपेक्षा जास्त शक्यता आहे. अगोदरचे रखडलेले व्यवहार पूर्ण व्हायला सुरुवात होईल. उच्च अधिकाऱ्यांच्या मदतीने तुमचे जमिनी संबंधात असलेले वाद विवाद लवकरात लवकर मिळतील. प्रकृती बिघडण्याची दाट शक्यता आहे काळजी घेतलेल चांगलच. खाण्यापिण्याच्या सवयीची विशेष काळजी घ्या. आई-वडिलांच्या सेवेचा मोठा लाभ प्राप्त होईल. जोडीदाराची ठरलेल्या कामात साथ लाभेल. (Marathi Horoscope)

कुंभ राशी

इतर व्यक्तींशी झालेला वाद आज संपुष्टात येईल. तुमच्या व्यवसायामध्ये घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळाल्याने नवीन संधी प्राप्त होतील. गुंतलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये लवकरात लवकर शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे घरातील सर्व मंडळी एकत्रित येऊन कामांमध्ये व्यस्त असतील. नेहमीप्रमाणे नशिबाची साथ मिळेल.

मीन राशी

आजचा दिवस तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संधी घेऊन येत आहे. तुम्ही शोधत असलेले उत्पन्नाचे नवीन स्त्रोत आज मिळतील. व्यवसायामध्ये विचारपूर्वक पैसे गुंतवल्यास अधिकचा फायदा होईल. पैसे विचारपूर्वक खर्च केल्यास पैशांमध्ये वृद्धी होईल. व्यवसायात असलेले शत्रू पराभूत होण्याची शक्यता. आर्थिक स्थिती सुधारत असल्यामुळे भविष्याबद्दल चिंता कमी होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत यश मिळेल. धार्मिक कार्यामध्ये वेळ घालवण्याची गरज. (Daily Horoscope Update In Marathi)

Disclaimer – वरील राशिभविष्य पंचांगानुसार आहेत. प्रत्येक राशीमध्ये नमूद केलेल्या घटना व गोष्टी या सर्व पंचांगाचा तसेच ज्योतिषांच्या अभ्यासावर अवलंबून आहेत. प्रत्येक राशीनुसार गुणधर्म ठरत असतात, ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व राशींच्या फळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येक रास स्वतंत्र व विशेष गुणधर्म निर्माण करत असते.