मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Horoscope 21 June: या राशींना मिळेल चांगली बातमी, जोडीदारासोबत सकारात्मक योग जुळून येईल

Rushikesh Aher

By Rushikesh Aher

Published on:

Rashi Bhavishya Today 21 June: या राशींना मिळेल चांगली बातमी, जोडीदारासोबत सकारात्मक योग जुळून येईल

Horoscope Today In Marathi 21 June: कोणत्या राशींसाठी आज कोणता योग आहे, कोणत्या राशींच्या व्यक्तींना आज व्यापारात फायदा होईल तसेच कुठल्या राशींना आर्थिक फटका बसू शकतो हे सर्व जाणून घेऊया आजच्या राशिभविषाच्या माध्यमातून.

मेष राशी

आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईल. निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल, नोकरी आणि व्यवसायामध्ये मनाजोगती सफलता मिळेल. कौटुंबिक आयुष्यामध्ये गोंधळ असू शकतो, सांभाळून राहिलेले चांगले. जुन्या गोष्टींना उजाळा देण्यामध्ये वेळ वाया घालवू नका सध्याचा काळ हा नव्या विचारांना सोबत घेऊन भविष्याची मोट बांधण्याचा आहे.

वृषभ राशी

तुमचे आज धकाधकीचे जीवन आहे तसेच वेळेवर जेवण न केल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे समाधान व आनंद लाभणार नाही. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे उत्पन्नामध्ये मनाजोगी वाढ होईल. लांबचा प्रवास चांगलं फळ देणार असेल त्याचा निश्चितच फायदा होईल. चांगले भविष्यनिर्मिती करण्यासाठी आज कष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.

मिथुन राशी

मुलांच्या आरोग्याच्या कुरबुरी असू शकतात, वैवाहिक आयुष्यामध्ये गरजेपेक्षा जास्त वेळ देण्याची गरज भासत आहे. कामाबाबतीत अलिप्तता जाणवण्याची शक्यता. आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतीत केल्यास मनाला आनंद होईल. मानसिक स्वास्थ्य मधे अधिक वाढ होईल.

कर्क राशी

तुमचा स्वभाव आज थोडासा आक्रमक होईल, आरोग्याकडे लक्ष देण्याची तातडीने गरज आहे. यश प्राप्तीसाठी विशेष मेहनत करण्याची आवश्यकता. नियमित कामामध्ये मनाप्रमाणे काम होईल याची खात्री नाही. आर्थिक संचयामध्ये वृद्धी होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या आवडीप्रमाणे जवळच्या तीर्थक्षेत्राची योजना आखली जाईल.

सिंह राशी

घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी वाद टाळणे आवश्यक आहे, कारण यामुळे तुमच्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असे कुठल्याही स्वरूपातले काम अजिबात करू नका. आरोग्याच्या तक्रारी वर तोंड काढत आहे त्याकडे लक्ष देणे अनिवार्य. तुमच्या आहाराकडे चांगले लक्ष दिल्यास आरोग्याच्या समस्या कमी उद्भवतील. आज काही नवीन गोष्टींचा प्रवेश आयुष्यामध्ये होईल.

कन्या राशी

बोलताना सांभाळून बोलावे लागेल चुकून कुणाचातरी मन दुखावण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही घरापासून दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकता व त्या ठिकाणी तुम्ही तुमची आर्थिक प्रगती आणखी पुढे न्याल. मात्र या दरम्यान तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर राहाल. आंबट पदार्थ खाण्यातून वर्ज करा. नेहमीच्या व्यवसायातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता.

तूळ राशी

विकास आणि प्रगती साधण्यासाठी तुमच्याकडे समोरून काही संधी चालून येतील फक्त तुम्ही त्या ओळखणे गरजेचे. तुमच्या आजूबाजूला चांगली ऊर्जा जाणवेल व तुम्हाला इतरांसाठी नेतृत्व करण्याची गरज वाटेल. तुमच्या जवळच्या नातेवाईक तुम्हाला योग्य प्रकारे समजून घेण्यात यशस्वी होणार नाही व त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. वैवाहिक आयुष्य सुखी ठेवण्यासाठी जोडीदार सोबत वाद टाळणे गरजेचे.

वृश्चिक राशी

आजचा खर्च प्रमाणापेक्षा जरा अधिकच असेल, आधीच्या खर्चा प्रमाणे तुमचे उत्पन्न सुद्धा असेल तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थी त्यांच्या पातळीवर चांगली कामगिरी करतील. आज तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल, धार्मिक कार्यात स्वतःला वाहून घेतल्यास भविष्यात त्याचा फायदा दिसून येईल. प्रेम प्रकरणामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव येतील. एका बाजूला नैराष्ट्र येईल तर दुसऱ्या बाजूला तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होईल.

धनु राशी

तुम्ही तुमच्या कष्टांमुळे योग्य प्रगतीपथावर चालू लागाल, तरीही तुम्ही आळशी पणा टाळण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक सुखामध्ये वाढ होईल. कुटुंबासोबत काही अनुकूल गोष्टी घडण्याची शक्यता. अनोळखी व्यक्तीपासून जरा सांभाळून राहा. मुलांना अभ्यासामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये शिकण्यासाठी अगोदरपेक्षा थोडे जास्तीचे कष्ट घ्यावे लागतील.

मकर राशी

विविध प्रकारच्या संधीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या यशासाठी चांगले परिणाम दिसू लागतील. तुमचे सामाजिक वर्तुळ उंचावण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची समाजातील छबी उत्कृष्ट झळकेल. मुलांमध्ये एकाग्रतेची कमतरता जाणवेल लक्षपूर्वक अभ्यास करणे गरजेचे. आज काही आरोग्याच्या समस्या थोड्याफार प्रमाणामध्ये येऊ शकता ज्यामुळे अधिक चिडचिड होईल.

कुंभ राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे, व्यवसायामध्ये वाढ तर होईलच त्यासोबत गुंतवणुकीचे चांगले परतावे मिळेल. काही महिन्यांपासून तुम्ही करत असलेल्या उपक्रमांना चांगले यश प्राप्त होईल. खूप वर्षापासून असलेली उत्कंठ इच्छा आज पूर्ण होईल. उत्पन्नाचा आवाका इथून पुढे दिवसेंदिवस वाढतच राहील. जोडीदाराकडून मनाजोगे समाधान व लाभ प्राप्त होतील.

मीन राशी

कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण तुमच्या मनाप्रमाणे निर्माण होईल. तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा काही अनुकूल गोष्टी घडतील. आज आळस टाळा तेव्हाच तुम्हाला पुढचे यशाचे द्वार दिसेल. तुमचे सहकारी खूप कमी प्रमाणात मदत करतील स्वतःतील क्षमतांचा वापर करणे गरजेचे ठरेल. कमी अंतरावरचा प्रवास दिसून येत आहे, प्रवासादरम्यान तुमचे महत्त्वाचे कागदपत्र, दस्तऐवजांची काळजी घ्यावी.

Disclaimer – वरील आजचे राशीभविष्य पंचांगानुसार आहेत. प्रत्येक राशीमध्ये नमूद केलेल्या घटना व गोष्टी या सर्व पंचांगाचा तसेच ज्योतिषांच्या अभ्यासावर अवलंबून आहेत. प्रत्येक राशीनुसार गुणधर्म ठरत असतात, ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व राशींच्या फळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येक रास स्वतंत्र व विशेष गुणधर्म निर्माण करत असते.