मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Horoscope Today 25 June 2024: या राशींना मिळेल व्यवसायात यश, भावनांना आवर घाला अन्यथा..

Rushikesh Aher

By Rushikesh Aher

Published on:

Horoscope Today 25 June 2024: या राशींना मिळेल व्यवसायात यश, भावनांना आवर घाला अन्यथा..

Ajche Rashi Bhavishya: ज्योतिष शास्त्र हे असं शास्त्र आहे ज्यामध्ये जन्म कुंडलीच्या आधारावर वेगवेगळ्या प्रकारे भाकित वर्तवल्या जातात. ज्योतिष शास्त्रामध्ये वर्तवलेले भाकित हे एका प्रकारे अंदाज सांगतात. असंख्य व्यक्तींना ज्योतिष शास्त्राची प्रचिती आलेली आहे. आजच्या दिवसांमध्ये काय घडेल लाभ होईल की नुकसान हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा. 

मेष राशी

जवळच्या मित्राची अचानक भेट होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याचा राज योग आहे. राजकारणी व्यक्तींना राजकारणामध्ये उच्चपदावर संधी मिळण्याची दाट शक्यता. अपूर्ण असलेल्या कामांमध्ये आज यश येईल. बौद्धिक कार्यामध्ये मनाजोगा सन्मान प्राप्त होईल.    (आजचे राशीभविष्य मराठी)

वृषभ राशी

आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चढउतारांनी भरलेला आहे. विरोधकांपासून सावधान होणे गरजेचे. संयम ठेवून काम केल्यास यश प्राप्ती लोळण घेईल. तुमचे महत्त्वाचे असलेले काम सार्वजनिक करणे त्रासदायक ठरू शकते. व्यवसायामध्ये व्यस्त असलेल्या व्यक्तींना अचानकपणे लाभ मिळण्याची चिन्ह दिसत आहे. 

मिथुन  राशी

मनामध्ये सुरू असलेल्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. काही अपूर्ण असलेल्या कामांमध्ये निश्चित यश मिळेल. तुम्हाला महत्त्वाच्या मोहिमेची जिम्मेदारी मिळण्याची शक्यता आहे, तुम्ही मोहीम पूर्ण कराल. नवीन मित्र तुमच्या व्यवसायामध्ये सहयोगी ठरू शकतील. अध्यात्मामध्ये पूर्वीपेक्षा आज जास्त गोडी निर्माण होईल. 

कर्क राशी 

तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे काही विरोधक तुमच्या विरोधात जाळ टाकू शकता, मात्र तुम्हाला संयम ठेवून चालत राहणे गरजेचे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या व्यक्तींनी भाषेविषयी जपून काम करावे. नोकरी व्यवसायामध्ये नेहमीपेक्षा जास्त चिंता भेडसावण्याची शक्यता. कुठल्याही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. 

सिंह राशी

तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनाजोगे यश मिळेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या कार्याबद्दल धीटपणे उभे राहणे गरजेचे आहे. प्रलंबित असलेले काम लवकरात लवकर पूर्ण होतील. संयम राखून काम केल्यास तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त फायदा होईल. व्यवसायामध्ये नवीन सहयोगी प्राप्त होतील तर नोकरी व्यवसायामध्ये बढतीवर जाण्याची शक्यता आहे. 

कन्या राशी 

कुठल्याही परीक्षेमध्ये तसेच स्पर्धेत तुम्हाला मनाजोगे यश खेचून आणता येईल. पत्रकारितेच्या क्षेत्रातील लोकांना त्यांच्या बॉसकडून शाबासकी मिळू शकते. विद्यार्थी अभ्यासामध्ये अधिक रस घेऊ लागतील. तुमच्या व्यवसायात मित्र सुद्धा तुम्हाला सहयोग करू लागेल. राजकारणी व्यक्तींच्या आयुष्यात नवीन मित्रांची भर पडेल. 

तूळ राशी

तुमच्या मुलांकडून तुमच्या मनाजोगी सकारात्मक बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या कामांमध्ये येत असलेला अडथळा आज निर्माण होणार नाही. व्यवसायामध्ये नवीन प्रयोग केल्यास अधिक नफा होण्याची शक्यता. तुम्हाला लवकरच लांबच्या प्रवासाला जावे लागेल. बेरोजगार व्यक्तींना रोजगारा प्राप्त होण्याची चिन्ह आहे. 

वृश्चिक राशी 

आईशी मतभेद होऊ शकण्याची शक्यता आहे संयम राखून नम्रतेने वागा. शेतीच्या कामांमध्ये वेळ निघून गेल्यावर लक्ष गेल्यास तुम्हाला वाईट वाटेल. राजकारणामध्ये तुमच्या मनाप्रमाणे घडेल ज्यामुळे तुमचा दबदबा आणखीनच वाढेल. जास्त वेगाने वाहन चालवणे टाळा व शिस्तीत राहणे शिका. व्यवसायामध्ये मन एकाग्र करून वाटचाल करावी लागेल. 

धनु राशी 

तुमच्या साध्या राहणीमानामुळे आणि उच्च विचारसरणीमुळे तुमच्याकडे बरेच व्यक्ती आकर्षित होतील. तुमचा उत्साह व तुमची ऊर्जा बघून तुम्हाला शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. काही मोठी काम तुमच्या हातातून होतील. व्यवसायाच्या संदर्भामध्ये विदेशवारी होण्याची शक्यता. तुमच्याकडून नवीन व्यवसाय सुरू केल्या जाऊ शकतो. प्रलंबित बांधकामाच्या कामाला आजपासून गती मिळेल. 

मकर राशी

तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अक्कल हुशारीने निर्णय घ्यावा लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवून काम करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. व्यवसायामध्ये उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. राजकारणामध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे हवी असलेली जबाबदारी लाभू होऊ शकते. सामाजिक जबाबदारी अचानक वाढू लागेल व हे तुमच्या लक्षातही येईल. 

कुंभ राशी 

आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल. संयम ठेवा अनावश्यक वाद विवादामध्ये अजिबात पडू नका. जवळच्या चांगल्या मित्रांसोबत सकारात्मक मैत्री आणखी वाढू लागेल. विद्यार्थी दशेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना मनाजोगे परीक्षेत यश मिळेल. शत्रूंपासून सावधान रहाणे खूप गरजेचे आहे, तुमच्या कमकुवतपणाचा फायदा शत्रू कडून घेतल्या जाऊ शकतो. 

मीन राशी

नवीन व्यवसायाची सुरुवात जोमाने होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात येत असलेले अडथळे काही प्रमाणात दूर होतील. समाजावर तुमचा चांगला प्रभाव पडेल. धार्मिक कार्यामध्ये गुंतवून घेतलेल्या व्यक्तींना मनाजोगा परतावा गुंतवणुकीतून मिळेल. कोर्टाच्या कामामध्ये यश खेचून आणण्याची चिन्ह आहे. जमिनी इमारत किंवा इतर मौल्यवान प्रकारची वस्तू खरेदी करण्याची इच्छा वाढेल. 

Disclaimer – आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. वरील माहिती प्राप्त स्त्रोतांवरून घेण्यात आलेली आहे. वर दिलेल्या तथ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा दावा आमच्याकडून केल्या जात नाही. राशिभविष्य विषयी असलेले विचार तुमचे वैयक्तिक असतील.