मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Horoscope Today 28 June 2024: या राशींवर राहील शनीचा जोर, या व्यक्तींचा कौटुंबिक वाद मिटेल

Rushikesh Aher

By Rushikesh Aher

Updated on:

Horoscope Today 28 June 2024: या राशींवर राहील शनीचा जोर, या व्यक्तींचा कौटुंबिक वाद मिटेल

Ajache Rashi Bhavishya: ज्योतिष शास्त्रामध्ये शनि देवाला अत्यंत महत्त्व आहे. एखाद्या राशीमध्ये शनि देवाचा प्रवेश झाला तर ज्योतिष शास्त्रानुसार वेगवेगळे उपाय करावे लागतात. शनिदेव भक्तांना कधीच नाराज करत नाही. शनि देवाची आराधना नित्यनियमाने करणे गरजेचे असते. आजच्या राशिभविष्यामध्ये जाणून घेऊया कोणत्या घटना घडू शकतात व त्यावर उपाय. 

मेष राशी

या राशींच्या लोकांना त्यांच्या कुठल्याही कार्यामध्ये चांगले यश प्राप्त होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळणारा मानसन्मान दुपटीने वाढेल. व्यवसायामध्ये तुम्हाला इच्छित असल्याप्रमाणे वाढ दिसून येईल. वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे, वायफळ गप्पांमध्ये वेळ घालवू नका. 

वृषभ राशी

सध्याचे काही दिवस खूप मजे मध्ये जातील, त्यापुढे संयम राखणे गरजेचे. तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ लवकरच तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या माध्यमातून नवीन घर खरेदी केले जाऊ शकते किंवा नवीन शेतीचा व्यवहार होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवाल. 

मिथुन राशी

व्यवहारामध्ये अगोदर पेक्षाही अधिक परिवर्तन दिसून येईल. धार्मिक स्थळाला भेट देण्याची ही सर्वात चांगली वेळ आहे. जोडीदारासोबत जवळच्या धार्मिक स्थळाला भेट द्याल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहे. 

कर्क राशी

आजचा दिवस शनीच्या वक्रीचा असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना थोडा त्रास सहन करावा लागेल. शनि देवाची आराधना केल्यास तुम्ही इडा पिडा मधून सुटाल. मोठ्या मोठ्या तक्रारी सहज जाणवतील. कामाच्या ठिकाणी सांभाळून रहाव लागेल, सहकाऱ्यांसोबत वादविवाद होऊ शकतात शांतता राखणे गरजेचे. 

सिंह राशी

या राशीच्या लोकांना बरेच अडथळे जाणवतील मात्र अडथळे निघून गेल्यावर यश मिळणार आहे. नवनवीन मित्र मिळतील, ज्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित होतील. डोकेदुखीची सामान्य तक्रार केली जाऊ शकते. धार्मिक ठिकाणी जाऊन पूजा अर्चा करण्याची इच्छा होईल. 

कन्या  राशी

वैवाहिक आयुष्यामध्ये बऱ्यापैकी ताण-तणाव दिसून येईल. ताण तणाव दूर करण्यासाठी धार्मिक विधी मध्ये सामील होणे हा चांगला उपाय आहे. कुटुंबाला वेळ दिल्या जात नसल्यामुळे कुरबुरी वाढल्या आहेत. येणारा काळ चांगला आहे, सुख-समृद्धी भरपूर प्रमाणात मिळेल. 

तूळ राशी

आजचा संपूर्ण दिवस आनंदामध्ये व्यतित कराल. नवीन सहकारी ऑफिसमध्ये मानसन्मान देतील. कुटुंबाला वेळ द्यायची गरज आहे, स्वतःच्या कामात गरजेपेक्षा जास्त गुंतून घेतल आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा बेकारीला सामोर जाव लागेल. व्यावसायिक व्यक्तींना विदेशवारी घडण्याची चिन्ह दिसत आहे. 

वृश्चिक  राशी

अनेक दिवसापासून सुरू असलेला कौटुंबिक वाद आज संपून जाईल, कुटुंबामध्ये पुन्हा एकदा आनंदाची लहर येईल. कार्यक्षेत्रामध्ये अधिक मेहनत घ्यायची गरज आहे, मेहनत केल्यास त्याचे फळ लवकरच प्राप्त होईल. खोटे बोलणे टाळा, कुलदैवताचे दर्शन घ्यायला जाल. 

धनु राशी

रखडलेले राशीसर्व काम लवकरच मार्गी लागतील. नवीन लोकांशी संपर्क साधने व त्यांच्याकडून काम करून घेणे यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कुठल्याही कामांमध्ये पत्नीची खंबीरपणे साथ मिळेल. व्यापारामध्ये यश मिळवण्यासाठी अतोनात कष्ट करावे लागतील. व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय घेण्या अगोदर विचारपूर्वक घ्या. 

मकर राशी

लवकरच तुमच्या कानावर चांगली वार्ता ऐकू येईल. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. मनातल्या मनात वैचारिक आंदोलन वाढतच जाईल. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची जास्त शक्यता आहे. एखाद्या गोष्टीसाठी जीवनसाथीने खूप हट्ट धरला तर तिला ती गोष्ट घेऊन द्यावी लागेल. या राशीच्या लोकांचे आरोग्य ठणठणीत राहील. 

कुंभ राशी

आज पासून तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हायला सुरुवात होणार आहे. जुन्या गुंतवणूकदारांना मनाजोगे रिटर्न गुंतवणुकीच्या माध्यमातून प्राप्त होतील. ऑनलाइन काम करणाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळतील व त्या आधारे काम करावे लागेल. 

मीन राशी

आयुष्याला कलाटणी बसणारा दिवस आहे, आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्या यशाचा मार्ग आज तयार होईल व त्याद्वारे तुम्हाला भरगोस यश प्राप्ती होईल. तुम्हाला हव त्याप्रमाणे जीवनसाथीच सहकार्य असेल. कमी वेळेत पैसे डबल होतील अशा योजना टाळा. 

Disclaimer – आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. वरील माहिती प्राप्त स्त्रोतांवरून घेण्यात आलेली आहे. वर दिलेल्या तथ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा दावा आमच्याकडून केल्या जात नाही. राशिभविष्य विषयी असलेले विचार तुमचे वैयक्तिक असतील.