मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Pune News: खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जखमी

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

Pune News: खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जखमी

पुणे: खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे अमर मोहिते यांनी वेगात गाडी चालवताना दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील १९ वर्षीय ओम भालेराव याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर मध्यरात्री घडला. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. (Pune Accident News In Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, अमर मोहिते वेगाने आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवत होते. समोरून येणारी दुचाकी त्यांच्या गाडीला धडकली. या धडकेत दुचाकी हवेत उडून बाजूला फेकली गेली आणि ती पूर्णपणे नष्ट झाली.

आरोपीच्या मद्यप्राशनाची चाचणी केली जात आहे. या भीषण अपघातानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.