मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Maharashtra Weather Update: आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांसाठी एलो अलर्ट

Avatar

By Pratik Speaks

Updated on:

Maharashtra Weather Update: आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांसाठी एलो अलर्ट

महाराष्ट्र हवामान: महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. यंदा राज्यात मान्सूनचे अकाली आगमन झाले असले तरी सुरुवातीला मान्सून दाखल झाल्यानंतर कमी झाला. (Mumbai Weather Update) आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा जोर धरला असून, मुसळधार पावसाचे संकेत मिळत आहेत. अरबी समुद्रातून येणारे मोसमी वारे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करीत आहेत. येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईच्या उपनगरात अनेक दिवसांच्या कडक उन्हानंतर पावसाने पुनरागमन केल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी मुंबईतच नव्हे तर कोकणातही पावसाने हजेरी लावली. कोकणात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भाप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (Pune Weather Update) आणि साताऱ्यातही (Satara Weather Update) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.