Pune Metro: पुणे मेट्रोने गाठली विक्रमी प्रवासी संख्या, एका दिवसात तब्बल १,००,१७० प्रवाशांचा प्रवास

पुणे, २७ जून- पुणे मेट्रोने एका दिवसात विक्रमी १,००,१७० प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. पुणेकरांच्या वाहतुकीचे पसंतीचे साधन बनलेल्या मेट्रोची वाढती लोकप्रियता आणि विश्वासार्हता या यशामुळे वाहतूक कोंडी आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते.

मेट्रोच्या प्रवाशांच्या पाठिंब्याबद्दल आणि मेट्रो प्रवासाच्या फायद्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल X ह्या सोशल मिडियावर त्यांचे आभार मानून हा ऐतिहासिक टप्पा साजरा केला. या नेटवर्कचा विस्तार होत असताना पुणे मेट्रोने शहरातील रहिवाशांना सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

x