मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Pune: ‘कीर्ती’ खेलो इंडिया निवड, कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

Pune: 'कीर्ती' खेलो इंडिया निवड, कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) एमआयटी एडीटी विद्यापीठात आयोजित ‘खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन’ (कीर्ती) कार्यक्रमाला पश्चिम भारतातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. युवा क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक क्रीडा संकुलात आपले कौशल्य दाखविले. (Khelo India Rising Talent Identification (KIRTI) programme)

या कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी बॉक्सिंग मूल्यांकनाने झाली, त्यात पुणे आणि त्याबाहेरील स्पर्धकांचा सहभाग होता. २४ जून रोजी फुटबॉल व खो-खो, तर २५ जून रोजी कबड्डी व व्हॉलीबॉल या स्पर्धा होणार आहेत. प्रा.डॉ.सूरज भोयर व प्रा.पद्माकर फड यांनी युवा खेळाडूंना या संधीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले आहे. अधिक माहितीसाठी सुनील मोरे यांच्याशी संपर्क साधावा 9763398136