मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Pradhanmantri Ujjwala Yojana: प्रधानमंत्री उज्वला योजना नवीन अपडेट्स 2024 

Rushikesh Aher

By Rushikesh Aher

Published on:

Pradhanmantri Ujjwala Yojana: प्रधानमंत्री उज्वला योजना नवीन अपडेट्स 2024 

PM Yojana 2024: प्रधानमंत्री उज्वला योजना या योजनेचा शुभारंभ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 मध्ये झाला होता. या योजनेला पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस या मंत्रालयाद्वारे संचलित करण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत देशभरातील गरीब महिलांना तसेच ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे अशा महिलांना गॅस कनेक्शन देण्यात येते. 

या योजनेचा उद्देश प्रदूषणाचा उच्चांक कमी करणे आहे. स्वयंपाक घरातील गॅसमुळे पारंपारिक पद्धतीने चुलीवर नैसर्गिक इंधन वापरावे लागत नाही ज्यामुळे वातावरणातील शुद्धतेचे प्रमाण आणखीन वाढते व प्रदूषणाला आळा बसतो. योजनेच्या नियमावलीमध्ये बसणाऱ्या सर्व व्यक्तींना या गॅस कनेक्शनचे सरकारच्या माध्यमातून मोफत वितरण करण्यात येते. 

प्रधानमंत्री उज्वला योजना नेमक आहे काय?

प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत ग्रामीण भागातील तसेच सर्व क्षेत्रामधील गरीब कुटुंबांना व रेशन कार्ड धारकांना मोफत घरगुती गॅस वितरण केल्या जाते. प्रदूषणाचा वाढता आलेख बघून व गरीब महिलांची परिस्थिती बघून सरकारने या योजनेची रचना केलेली आहे. आतापर्यंत भारतातील असंख्य कुटुंबांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेतलेला आहे. 

पीएम उज्वला योजनेचे मुख्य फायदे 

  • या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच ग्रामीण भागातील गरीब महिलांना तसेच इतर सर्व गरीब कुटुंबांना व रेशन कार्ड धारकांना मोफत एलपीजी गॅसचे कनेक्शन देण्यात येत आहे. 
  • या योजनेमुळे महिलांना चुलीच्या धुरापासून सुटकारा मिळेल व त्या कमी वेळेमध्ये स्वयंपाक बनवून इतर ठिकाणी वेळ देऊ शकतील. 
  • पीएम उज्वला योजनेमुळे कोळसा व जळणाच्या लाकडापासून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यात बऱ्यापैकी यश येणार आहे, ज्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी केल्या जाईल. 
  • महिलांना व कुटुंबातील लहान मुलांना धुरापासून होणाऱ्या आजारांना बळी पडावं लागणार नाही व कुटुंबातील सर्व व्यक्ती आरोग्याच्या बाबतीत सुदृढ असतील. 

प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी काय निकष आहेत?

प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी सरकारने काही निकष ठरवून दिलेले आहेत. सरकारने राहून दिलेल्या निकषांच्या अंतर्गतच नियमावलीप्रमाणे अर्ज करता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून काय काय निकष सरकारने ठरवलेले आहे ते आपण खाली बघू. 

  • पीएम उज्वला योजनेसाठी पुरुष अर्ज करू शकत नाही फक्त महिलांनाच अर्ज करण्याचा योजनेनुसार अधिकार आहे. 
  • अर्ज करणाऱ्या महिलेचे वय कमीत कमी 18 वर्ष असायला हवे, अठरा वर्षाखालील व्यक्ती योजनेमध्ये पात्र होणार नाही. 
  • ज्या महिलांकडे अगोदरच एलपीजी गॅसचे कनेक्शन असेल त्यांना या योजनेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. 
  • आवेदन करणाऱ्या महिलेचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे, खाते नसल्यास लवकरात लवकर खाते उघडून घेणे अनिवार्य आहे. 

प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्र 

खाली प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांना सूचिबद्ध केलेले आहे, त्यापैकी सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरता येईल. 

  • राशन कार्ड 
  • आधार कार्ड 
  • दारिद्र्य रेषेचे कार्ड 
  • वय प्रमाणपत्र 
  • चालू मोबाईल नंबर 
  • चालू बँक खाते 
  • दोन पासपोर्ट साईज फोटो 

वर दिलेल्या माहितीप्रमाणे सूत्रबद्धतेने तुम्ही पात्र असल्यास सर्व निकष पूर्ण करून या योजनेसाठी फॉर्म भरू शकता. खास करून गरीब महिला व ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता.