मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Pune News: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी पुण्यात ड्राय डे जाहीर

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

Pune News: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी पुण्यात ड्राय डे जाहीर

पुणे : पंढरपू पायी वारी लवकरच चालू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ड्राय डे जाहीर केला आहे. त्या दिवशी पालखी ज्या भागातून मुक्काम करत जाणार आहे, त्या भागात ड्राय डे पाळण्यात येणार आहे. तसेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांना बेकायदा जमाव जमण्याची शक्यता असलेली ठिकाणे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Latest Pune News Marathi)

तुकाराम महाराजांची पालखी २८ जून रोजी देहू गाव येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. त्या रात्री पालखी इनामदार साहेब वाड्यात मुक्काम करणार आहे. नंतर संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम विठ्ठल मंदिर, आकुर्डी, नाना पेठ, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, संसार, अंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर आणि सराटी येथे मुक्काम करणार आसून वरील प्रत्येक भागात ड्राय डे असणार आहे. (पुणे बातम्या)

हे पण वाचा: Dnyaneshwar Maharaj Palkhi 2024 Timetable

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २९ जून रोजी आळंदीयेथून प्रस्थान करणार आहे. आळंदीतील गांधी वाडा, भवानी पेठ, सासवड, जेजुरी आणि वाल्हे येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे मुक्काम असतील. त्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या वरील प्रत्येक भागात ड्राय डे असणार आहे. (Pune News Today Marathi)

हा ड्राय डे पळखींच्या प्रत्येक मुक्कामाठिकाणी प्रस्थानांतर दोन तासांपर्यंत असेल, असे आदेशात सांगितले आहे.