मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Vat Purnima Wishes In Marathi: वटपौर्णिमेच्या निमित्त हे संदेश, स्टेटस पाठवून द्या शुभेच्छा

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

वटपौर्णिमेच्या निमित्त हे संदेश, स्टेटस पाठवून द्या शुभेच्छा

Vat Purnima Shubhechha In Marathi: वटपौर्णिमा व्रताच्या समारोपानंतर, विवाहित महिलांनी या पवित्र विधीसाठी तयारी केली आहे. हिंदू पंचांगात वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व खूप मोठे आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला काही ठिकाणी एक महत्त्वाचा उपवास पाळला जातो, तर इतर ठिकाणी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला या परंपरेचे पालन केले जाते.

उत्तर भारतीय राज्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशा येथे महिलांनी आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी पाळलेल्या या उपवासाला वट सावित्री व्रत म्हणतात. त्याउलट, महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतातील या पाळणाऱ्या या विधीला “वटपौर्णिमा” म्हणतात. यावर्षी हे व्रत २१ जूनला साजरे केले जाईल.

या पवित्र पौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाच्या प्राचीन परंपरेप्रमाणे त्यांची पूजा करतात. या सणाच्या शुभेच्छांचा संदेश पाठवला जातो. या विशेष दिनाचे औचित्य साधून, आपण आपल्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी हृदयस्पर्शी संदेश, रोमँटिक कोट्स, व्हॉट्सअॅप संदेश, आणि GIF शुभेच्छा पाठवू शकता.

Vat Purnima Wishes In Marathi

1. सण सौभाग्यचा..
बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत
तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमा
सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
(वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा २०२४)

2. नात्यात गुंफले प्रेमाचे धागे,
जबाबदारीने आणि संसार फुलले
वडाला बांधून दोरे साथ अशीच राहू दे
हेच माझं स्वप्न
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(Vat Purnima Status Marathi 2024)

हे पण वाचा: Vat Purnima 2024: तारीख, मुहूर्त, विधी, आणि महत्त्व जाणून घ्या

3.कायम राहो तुझी अशीच साथ,
दीर्घायुष्य लाभो खास!
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
(Vat Purnima Shubhechha Navroba 2024)

4.वटपौर्णिमेचा दिवस हा खास…
लागून राहिली आहे साता जन्माची आस!
(वट पौर्णिमेच्या शुभेच्छा नवऱ्यासाठी)

५. मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

६.पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन,
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

७.वटपौर्णिमेला सुवासिनी पूजतात वड
सावित्रीच्या आठवणीने होते अंतःकरण जड…
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

८. वटवृक्ष लावोनी दारोदारी
करावी वटपौर्णिमा साजरी

९. मोठ्यांंचा आशीर्वाद आणि
पतीचं प्रेम हेच आहे
माझ्या वटपौर्णिमेचं खरं प्रेम

१०. सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

११. नाही केवळ सजण्याधजण्याचा हा सण…
जन्मोजन्मीची आहे गाठ
वटपौर्णिमेच्या सणाचा आहे
काही वेगळाच थाट… वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

१२. ज्येष्ठ पौर्णिमेच्या अर्थात
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!