मराठी बातम्या पुणे मुंबई महाराष्ट्र राशीभविष्य भारत आर्थिक तंत्रज्ञान खेळ राजकारण जॉब्स योजना आरोग्य हवामान लाईफस्टाईल

Chhagan Bhujbal: राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी, छगन भुजबळ कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

Avatar

By Marathi Speaks Desk

Published on:

Chhagan Bhujbal: राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी, छगन भुजबळ कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकी नंतर छगन भुजबळ हे नराज असून ते ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चेने चांगलाच जोर पकडला आहे. या चर्चेवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सुनील तटकरे यांनी आज पत्रकरांशी बोलताना छगन भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. (Chhagan Bhujbal News Marathi)

छगन भुजबळ कोणत्या पक्षात जाणार?

सूत्रांच्या माहिती नुसार छगन भुजबळ हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडकनुक झाल्या पासून छगन भुजबळ हे नाराज असलेल्या चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत आणि मिलिंद नारवेकर यांच्या सोबत छगन भुजबळ यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (राजकीय बातमी) त्यामुळे छगन भुजबळ यांच्या या भेटी मागे काय दडलय हे पाहण तितकच महत्त्वाचा आहे. ह्या भेटी ने भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालत आहे.

काय म्हणाले सुनिल तटकरे?

सुनील तटकरे पत्रकारांशी बोलत असताना बोलले की, छगन भुजबळ यांच्या ठाकरे गटात जाणार आशा होत असलेल्या चर्चा खोट्या आहेत. भुजबळ साहेब आमच्या राष्ट्रावादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. छगन भुजबळ हे आमचे नेते आहेत आणि ते कोठे ही जाणार नाहीत. ज्या काय त्यांच्या विषयी होत असलेल्या चर्चा ह्या निव्वळ अफवा आहेत, असे सुनील तटकरे म्हणाले.