“कन्यादहन” या नाटकाचा शुभारंभ प्रयोग महाराजांच्या चरणी अर्पण

WhatsApp Channel Follow Channel

राजापूर – रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी राजापूर तालुक्यातील शेंबवणे गांगोची वाडी या ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

शिवजयंती उत्सव निमित्त रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ठीक रात्री दहा वाजता वास्तव क्रिएशन प्रस्तुत एक हृदयस्पर्शी चित्तथरारक सामाजिक नाट्य कलाकृती “कन्यादहन”- शोध स्त्री अस्तित्वाचा.. या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचा शुभारंभाचा नारळ या ठिकाणी फोडण्यात आला. हे नाटक राजापूर तालुक्यातील गोठणे गावातील सुपुत्र सुरज हातणकर यांच्या लेखणीतून साकारलेल त्याच प्रमाणे याच दिग्दर्शन श्री सुरेश खानविलकर यांनी केले आहे. सर्व कलाकारांनी अगदी उत्तमरीत्या आपली कला सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली. या नाटकासाठी श्री आनंद कुबल यांनी संगीत दिले त्याचप्रमाणे विजय माळी यांनी आपल्या प्रकाश योजनेने नाटकाला एक वेगळाच रंग आणला. नाटक म्हटलं की साऊंड हे आलंच राजापूर तालुक्यातील चिखलगाव सिद्धेश निखारंगे याने उत्तमरीत्या साऊंड लावून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले. श्री गणेश पुजारी सर यांनी या नाटकासाठी नृत्यदिग्दर्शक आणि रंगभूषाकार असे उत्तम काम केले आहे. (Rajapure News Today)

या नाटकामध्ये भाग घेणारे कलाकार पुढीलप्रमाणे – शाहिर सौ. प्रिती भोवड-वीर, नैना धोत्रे, अनुष्का कामटेकर, अक्षता वेद्रे, आशिष वेद्रे, ऋतुराज दिवेकर, स्वरूप बाईत, जयेश कातकर, मंगेश कुलये, विनय फटकरे, साईनाथ बाईत, रोहित भातडे, रोशन वीर, अभिषेक हातणकर, अक्षय नाचणेकर, आणि इतर (Entertainment News Marathi)

सहकारी कलाकार…

या सर्वांनी अगदी उत्तम कामं करून प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सर्व कलाकारांचा गौरव केला. “वास्तव क्रियेशन कलामंच मुंबई” या कलामंचामध्ये कोणीही मोठा असा कलाकार नाही. हे कलामंच सर्वसामान्य कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी कार्यरत आहे.

“कन्यादहन ” या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्हाला संपर्क करा – सुरज हातणकर – ९३७००००३५३ , स्वरूप बाईत – ९७६७७४१७२२ , सुरज कुवार – ८८५०२४२८८९.

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment

x