शिक्षक दिन 2023: दरवर्षी 5 सप्टेंबर ला का साजरा केला जातो शिक्षक दिन, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

WhatsApp Channel Follow Channel

भारतात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (teachers day 2023 information in marathi) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांना समर्पित आहे. आपल्या देशात या तिथीला हा दिवस साजरा करण्याचे स्वतःचे महत्त्व आहे. ५ सप्टेंबर १८८८ रोजी जन्मलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ हा दिवस खास साजरा केला जातो.

डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती तसेच महान विद्वान, तत्त्वज्ञ आणि भारतरत्न विजेते होते. चला तर मग जाणून घेऊया आजच्या शिक्षक दिनानिमित्त या दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व-

शिक्षक दिनाचा इतिहास | Teachers day history in marathi

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १९६२ मध्ये भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे ५ सप्टेंबर हा विशेष दिवस म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. तेव्हा राधाकृष्णन म्हणाले की, माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्यापेक्षा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल. याच इच्छेनंतर १९६२ साली पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

शिक्षक दिनाचे महत्त्व | Teachers day importance in marathi

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षक म्हणून आपल्या आयुष्यातील ४० वर्षे देशासाठी समर्पित केली. शिक्षकांच्या सन्मानावर त्यांनी नेहमीच भर दिला. समाजाला योग्य दिशा देण्यात खरा शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो, असे त्यांचे मत होते. खरा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जायला शिकवतो आणि त्यांचे जीवन सुधारण्यात मोलाचा वाटा उचलतो, त्यामुळे शिक्षकांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. शिक्षकांच्या या सर्व योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतात 5 सप्टेंबर ला शिक्षक दिन साजरा केला जातो, तर जगातील अनेक देशांमध्ये हा दिवस एक महिन्यानंतर म्हणजे 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो. १९९४ मध्ये युनेस्कोने शिक्षकांच्या सन्मानार्थ ५ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्याची घोषणा केली. रशिया, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, बांगलादेश, श्रीलंका, ब्रिटन, पाकिस्तान, इराण या देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment

x